Bp act कलम २२ जे-४ : १.(विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२ जे-४ :
१.(विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये :
विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील कार्ये पार पाडील :-
अ) संबंधित मंडळ, विशेषीकृत अभिकरणांमधील पोलीस निरीक्षक दर्जाच्या सर्व पोलीस कर्मचारीवर्गाच्या सर्व बदल्या व पदस्थापना या बाबी निर्णीत करील.
ब) संबंधित मंडळास, विशेषीकृत अभिकरणाच्या बाहेर पोलीस निरीक्षक दर्चाच्या पोलीस कर्मचारीवर्गाच्या पदस्थापना व बदल्या करण्यासंबंधात पोलीस अस्थापना मंडळ क्रमांक २ याला उचित शिफारशी करण्यासाठी प्राधिकृत केलेले असेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, पोलीस कर्मचारीवर्ग या शब्दप्रयोगाचा अर्थ, पोलीस निरीक्षक दर्जाचा कर्मचारीवर्ग, असा आहे.)
——-
१. सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम ४ अन्वये समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply