Bp act कलम २२स : विभाग स्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरण :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२स :
विभाग स्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरण :
१) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनार्थ, विभाग स्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरण या नावाने संबोधले जाणारे प्राधिकरण घटित करील.
२) विभाग स्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरण पुढील सदस्यांनी मिळून बनलेले असेल :-
अ) निवृत्त प्रधान जिल्हा न्यायाधीश – अध्यक्ष ;
ब) पोलीस अधीक्षकाच्या दर्जापेक्षा कमी दर्जाचा नसलेला नियत वयोमानाने सेवानिवृत्त झालेला एखादा अधिकारी – सदस्य ;
क) पोलीस उप-आयुक्त (मुख्यालय) – सदस्य ;
ड) नागरी समाजामधील मान्यवर व्यक्ती – सदस्य ;
इ) पोलीस उप-अधीक्षकाच्या दर्जाचा किंवा त्याच्या समतुल्य दर्जाचा अधिकारी – सदस्य-सचिव ;
३) पोट-कलम (१) अन्वये विभाग स्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरण घटित केल्यावर दिनांक १५ जुलै २०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये गृह विभागाने घटित केलेले पूर्वीचे जिल्हा पोलीस तक्रार प्राधिकरण अस्तित्वात असण्याचे बंद होईल.
४) तक्रारी किंवा चौकशी आणि शिफारशी, अध्यक्षांची नेमणूक, राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणांचे अधिकार व कार्ये आणि त्याने राज्य शासनाला अहवाल सादर करणे यासंबंधातील, अनुक्रमे, कलमे २२ प, २२ क्यू व २२ र यांच्या तरतुदी, योग्य त्या फेरफारांसह, विभाग स्तरीय पोलीस तक्रार प्राधिकरणास लागू असतील.

Leave a Reply