Bp act कलम २२ल : पूर्वीची पोलीस आस्थापना मंडळे अस्तित्वात असण्याचे बंद होणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२ल :
पूर्वीची पोलीस आस्थापना मंडळे अस्तित्वात असण्याचे बंद होणे :
या अधिनियमातील पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २, परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ आणि आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ घटित करण्यात आल्यावर, दिनांक १५ जुलै २०१३ रोजीच्या शासन निर्णयान्वये गृह विभागाने घटित केलेली पूर्वीची पोलीस आस्थापना मंडळे अस्तित्वात असण्याचे बंद होईल :
परंतु, पूर्वीच्या पोलीस आस्थापना मंडळांनी घेतलेले निर्णय व केलेल्या शिफारशी, जणू काही, या अधिनियमान्वये संबंधित पोलीस आस्थापना मंडळांनी घेतलेले निर्णय व केलेल्या शिफारशी असल्याप्रमाणे, प्रवर्तनात असण्याचे चालू राहील.

Leave a Reply