महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२ड :
पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ ची कार्ये :
पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ पुढील कार्ये पार पाडील :-
१) या अधिनियमाच्या तरतुदींना अधीन राहून, कलम २२क च्या पोट-कलम (१) अन्वये घटित केलेल्या मंडळास, वेतन व भत्ते वगळून, पोलीस अधिकाऱ्यांच्या सेवाशर्ती संबंधात, राज्य शासनाला उचित शिफासरशी करता येतील.
२) विशेषत: आणि पूर्वगामी कार्याच्या सर्वसाधारणतेला बाध न आणता, मंडळाला, पुढील कार्यांपैकी सर्व किंवा कोणतीही कार्ये पार पाडता येतील :-
अ) पोलीस अधिकाऱ्याची पदस्थापना व बदली यासंबंधात राज्य शासनाला सल्ला देणे व शिफारशी करणे १.(आणि त्याच्या शिफारशींचा राज्य शासन यथायोग्य विचार करील;)
ब) पोलीस अधिकाऱ्यांच्या बढत्या, शिस्तभंगविषयक कार्यवाही आणि सेवाविषयक इतर बाबी यासंबंधात त्यांच्याकडून उक्त मंडळाला प्राप्त झालेल्या गाऱ्हाण्यांच्या बाबतीत, राज्य शासनाला उचित शिफारशी करणे.
३) मंडळ, राज्य शासनाकडून त्या मंडळाला वेळोवेळी नेमून देण्यात येतील अशी इतर कार्ये पार पाडील.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, पोलीस अधिकारी या संज्ञेचा अर्थ, पोलीस उप-अधीक्षक या दर्जाचा आणि त्यावरील दर्जाचा पोलीस अधिकारी, असा आहे.
——–
१. सन २०१५ चा अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम ३ अन्वये समाविष्ट करण्यात आले.