Bp act कलम २२जे : आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२जे :
आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळाची कार्ये :
आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ पुढील कार्ये पार पाडील :-
अ) हे मंडळ, त्या आयुक्तालयांतर्गत पोलीस उप-निरीक्षक ते पोलीस निरीक्षक या दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या सर्व बदल्या, पदस्थापना व सेवाविषयक इतर बाबी निर्णीत करील.
ब) मंडळास, पोलीस उप-निरीक्षक ते पोलीस निरीक्षक या दर्जाच्या अधिकाऱ्यांची पदस्थापना व बदल्या आयुक्तालयाबाहेर करण्यासंबंधात पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ याला उचित शिफारशी करण्यासाठी प्राधिकृत केलेले असेल.
स्पष्टीकरण :
या कलमाच्या प्रयोजनार्थ, पोलीस अधिकारी या शब्दप्रयोगाचा अर्थ, पोलीस उप-निरीक्षक ते पोलीस निरीक्षक या दर्जाचा पोलीस अधिकारी, असा आहे.

Leave a Reply