महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२क :
पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ :
१) राज्य शासन, राजपत्रातील अधिसूचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ या नावाने संबोधले जाणारे एक मंडळ घटित करील.
२) पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १ पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल :-
अ) अपर मुख्य सचिव (गृह) – अध्यक्ष;
ब) पोलीस महासंचालक व महानिरीक्षक – उपाध्यक्ष ;
क) महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – सदस्य;
ड) पोलीस आयुक्त, मुंबई – सदस्य;
इ) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (आस्थापना) – सदस्य-सचिव :
परंतु, उपरोक्त सदस्यांपैकी एकही सदस्य मागासवर्गातील नसेल तर, राज्य शासन, अशा प्रवर्गातील, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक या दर्जाच्या अतिरिक्त सदस्यांची नियुक्ती करील.
स्पष्टीकरण :
या पोटकलमाच्या प्रयोजनार्थ, मागास वर्ग या शब्दप्रयोगाचा अर्थ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिूसचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग, असा आहे.