महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२के :
पोलीस आस्थापना मंडळांनी नियम व अटींचे अनुपालन करणे :
या अधिनियमाखालील कार्ये पार पाडतांना, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक १, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २, परिक्षेत्र स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ १.(, आयुक्तालय स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ, जिल्हास्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ आणि विशेषीकृत अभिकरणांच्या स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ) हे, वेळोवेळी अंमलात असतील अशा नियमांसह व विनियमांसह कायद्याच्या सर्व तरतुदींचे अनुपालन व अनुसरण करतील .
——–
१. सन २०१५ चा अधिनियम क्रमांक ११ याच्या कलम ५ अन्वये आणि अ्रायुक्ताला स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ याऐवजी समाविष्ट करण्यात आले.