Bp act कलम २२ओ : अन्वेषण पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था पोलीस यांचे विलगीकरण करणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२ओ :
अन्वेषण पोलीस आणि कायदा व सुव्यवस्था पोलीस यांचे विलगीकरण करणे :
१) प्रत्येक पोलीस ठाण्यातील गुन्हे शाखा किंवा स्थानिक गुन्हे शाखा आणि तपास किंवा अन्वेषण कक्ष हे केवळ गुन्हांच्या अन्वेषणावर लक्ष केंद्रित करतील आणि त्यांच्यावर सर्वसामान्यत: कायदा व सुव्यवस्था, सुरक्षा आणि इतर कर्तव्ये सोपविण्यात येणार नाहीत.
२) युनिट कमांडर हे प्रत्येक युनिटमधील अन्वेषण किंवा तपास शाखा आणि कायदा व सुव्यवस्था आणि इतर शाखा यांच्यामध्ये समन्वय असल्याची सुनिश्चिती करतील.

Leave a Reply