Bp act कलम २२इ : पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २२इ :
पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ :
१) राज्य शासन, राजपत्रातील अधिसुचनेद्वारे, या अधिनियमाच्या प्रयोजनांसाठी, पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ या नावाने संबोधले जाणारे एक मंडळ घटित करील.
२) पोलीस आस्थापना मंडळ क्रमांक २ पुढील सदस्यांचे मिळून बनलेले असेल :-
अ) पोलीस महासंचालक व महानिरीक्षक – अध्यक्ष ;
ब) महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग – सदस्य;
क) पोलीस आयुक्त, मुंबई – सदस्य;
ड) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) – सदस्य;
इ) सचिव किंवा यथास्थिति, प्रधान सचिव (अपील व सुरक्षा) – सदस्य;
फ) अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक (आस्थापना) – सदस्य-सचिव :
परंतु, उपरोक्त सदस्यांपैकी एकही सदस्य मागासवर्गातील नसेल तर, राज्य शासन, अशा प्रवर्गातील, अपर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक या दर्जाच्या अतिरिक्त सदस्याची नियुक्ती करील.
स्पष्टीकरण :
या पोट-कलमाच्या प्रयोजनार्थ, मागास वर्ग या शब्दप्रयोगाचा अर्थ, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, निरधिसूचित जमाती (विमुक्त जाती), भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्ग व इतर मागास वर्ग, असा आहे.

Leave a Reply