महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम २०:
पोलिसांसंबंधीच्या हिशेबाच्या (लेख्यांच्या) बाबींची तपासणे करणे-विनियमन करण्याची १.(महासंचालकाची व महानिरीक्षकाची आणि) आयुक्तांची शक्ती (अधिकार):
१.(महासंचालक व महानिरीक्षक) यांस २.(संपूर्ण राज्यात) व ज्या क्षेत्रासाठी आयुक्त नेमण्यात आला असेल त्या क्षेत्रात आयुक्ताला, राज्य शासनाच्या आदेशांस अधीन राहून यथास्थिती, २.(राज्यातील) किंवा त्या क्षेत्रातील पोलिसासंबंधीच्या लेख्याच्या सर्व बाबींची तपासणी करण्याचा व त्यांचे नियमन करण्याचा प्राधिकार असेल आणि संबंधित सर्व व्यक्तींना अशी तपासणी करताना त्यास योग्य ती मदत करणे व सवलती देणे व परिणामी त्याने दिलेले आदेश पाळणे बंधनकारक असेल.
——–
१. सन १९८७ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३२ याच्या कलम २ अन्वये महानिरीक्षक या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले व हा मजकूर १३ डिसेंबर १९८२ पासून समाविष्ट करण्यात आला असल्याचे मानण्यात येईल.
२. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ११ अन्वये दुसऱ्या राज्यात घातलेले प्रदेश वगळून, पुनर्रचनेपूर्वीच्या मुंबई राज्यात या ऐवजी समाविष्ट करण्यात आले.