Bp act कलम १६० : प्रत्यक्ष प्राधिकारान्वये केलेला कोणताही नियम किंवा दिलेला आदेश किंवा निदेश सद्भावनापूर्वक अमलात आणल्याबद्दल कोणताही लोकसेवक वर म्हटल्याप्रमाणे पात्र असणार नाही :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १६० :
प्रत्यक्ष प्राधिकारान्वये केलेला कोणताही नियम किंवा दिलेला आदेश किंवा निदेश सद्भावनापूर्वक अमलात आणल्याबद्दल कोणताही लोकसेवक वर म्हटल्याप्रमाणे पात्र असणार नाही :
राज्य शासनाने किंवा त्या बाबतीत या अधिनियमान्वये किंवा त्या अन्वये केलेल्या किंवा दिलेल्या कोणत्याही नियमान्वये, आदेशांन्वये किंवा निदेशाअन्वये शक्ती प्रदान केलेल्या व्यक्तीने, प्राधिकार आहे असे समजून दिलेला असा आदेश किंवा निदेश सद्भावनापूर्वक अमलात आणावयाच्या कारणावरुन योग्य रीतीने नेमलेला किंवा प्राधिकार दिलेला कोणताही लोकसेवक किंवा व्यक्ती कोणताही दंड भरण्यास किंवा नुकसानभरपाई देण्यास पात्र असणार नाही.

Leave a Reply