महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १५९ :
कर्तव्यानुसार सद्भावनापूर्वक केलेल्या कृत्याबद्दल कोणताही दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी दंड भरण्यास किंवा नुकसानी भरुन देण्यास पात्र असणार नाही :
या अधिनियमाच्या किंवा त्या वेळी अमलात असलेल्या इतर कोणत्याही विधीच्या किंवा त्यात केलेल्या किंवा दिलेल्या कोणत्याही नियमाच्या, आदेशाच्या किंवा निदेशाच्या कोणत्याही उपबंधाअन्वये कोणत्याही महसूल आयुक्तावर, दंडाधिकाऱ्यावर किंवा पोलीस अधिकाऱ्यावर लावण्यात आलेल्या कोणत्याही कर्तव्यास किंवा त्यास प्रदान करण्यात आलेल्या कोणत्याही अधिकाऱ्यास अनुसरुन किंवा अनुसरण्याच्या उद्देशाने १.(कोणत्याही महसूल आयुक्ताने, दंडाधिकाऱ्याने) किंवा पोलीस अधिकाऱ्याने सद्भावनापूर्वक केलेल्या कृत्याबद्दल तो कोणताही दंड भरण्यास किंवा नुकसानभरपाई देण्यास पात्र असणार नाही.
———
१. १९५८ चा मुंबई अधिनियम क्रमांक ८ याचे कलम ३, अनुसूची अन्वये कोणत्याही फौजदारी न्यायालयाने या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.