महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १५७-अ :
१. (रिकाम्या पदावर कार्यभार धारण करणारा अधिकारी सक्षम असेल :
आयुक्त, दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांचे पद रिकामे झाल्याच्या परिणामी, कोणताही अधिकारी, असा आयुक्त, दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांच्या पदाचा कार्यभार धारण करील किंवा त्याच्या पदावर हंगामी किंवा कायमच्या स्वरुपात येईल, तर असा अधिकारी यथास्थिती असा आयुक्त, दंडाधिकारी किंवा पोलीस अधिकारी यांना या अधिनियमान्वये अनुक्रमे प्रदान करण्यात आलेल्या शक्तींचा वापर करण्यास आणि त्यांच्यावर लादण्यात आलेली सर्व कर्तव्ये पार पाडण्यास सक्षम असेल.)
——–
१. सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५७ याच्या कलम ५ अन्वये हे कलम समाविष्ट करण्यात आले.