महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १५० :
आरोपी जेव्हा – पोलीस शिपायापेक्षा वरच्या दर्जाचा असेल तेव्हा कोर्टाचे अधिकार :
या अधिनियमाविरुद्ध केलेले अपराध हे, आरोपी व्यक्ती किंवा आरोपी व्यक्तींपैकी कोणतीही व्यक्ती शिपायाहून वरच्या दर्जाचा पोलीस अधिकारी असेल तेव्हा इलाखा शहर दंडाधिकारी किंवा द्वितीय श्रेणीच्या दंडाधिकाऱ्याकडून कमी दर्जाचा नसेल अशा दंडाधिकाऱ्याने चालविले असतील ते खेरीजकरुन दखली असतील.