महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १४९ :
कलम ७० मधील आदेशास विरोध करणे अगर अनुपालन न करणे शिक्षा :
जी कोणतीही व्यक्ती, कलम ७० अन्वये दंडाधिकाऱ्याने किंवा पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या कोणत्याही वाजवी निदेशास विरोध करील किंवा त्याचे अनुपालन ताबडतोब करणार नाही किंवा अशा निदेशास विरोध करण्यात किंवा त्याचे अनुपालन न करण्यात मदत करील तीस अपराधसिद्धीनंतर, एक वर्षांपर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा होईल, परंतु ती लेखी नमूद करावयाच्या कारणाखेरीज, चार महिने मुदतीपेक्षा कमी असणार नाही आणि तिला दंडाचीही शिक्षा होईल.