महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १४७ :
पोलीस अधिकाऱ्याने त्रासदायक रीतीने प्रवेश करणे, झडती घेणे, अटक करणे वगैरे शिक्षा :
जो कोणताही पोलीस अधिकारी,-
अ) वैधरीत्या मिळालेल्या प्राधिकाराशिवाय किंवा वाजवी कारणाशिवाय कोणत्याही इमारतीत, जहाजात, तंबूत किंवा जागेत प्रवेश करील किंवा इतर व्यक्तीस प्रवेश करावयास लावील किंवा झडती घेईल किंवा घेववील;
ब) कोणत्याही व्यक्तीची मालमत्ता त्रासदायक रीतीने आणि विनाकारण जप्त करील;
क) कोणत्याही व्यक्तीस त्रासदायक रीतीने व विनाकारण अटाकावून ठेवील, तिची झडती घेईल किंवा तीस अटक करील;
ड) त्याच्या अभिरक्षेतील कोणत्याही व्यक्तीवर विनाकारण कोणताही शारीरिक अत्याचार करील; किंवा
इ) विधिअन्वये तसा अधिकार नसेल अशी कोणतीही धमकी किंवा आश्वासन देऊ करील; त्यास अपराधसिद्धीनंतर अशा प्रत्येक अपराधाबद्दल सहा महिनेपर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा किंवा पाचशे पाचशे रुपयांपर्यंत असू शकेल अशी दंडाची शिक्षा होईल किंवा दोन्ही शिक्षा होतील.