Bp act कलम १४५ : खोटे निवेदन करणे व पोलीस अधिकाऱ्याचे गैरशिस्त वर्तन यासाठी शिक्षा :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १४५ :
खोटे निवेदन करणे व पोलीस अधिकाऱ्याचे गैरशिस्त वर्तन यासाठी शिक्षा :
१) जी कोणतीही व्यक्ती पोलीस अधिकारी म्हणून नोकरी मिळवण्याच्या किंवा नोकरीतून मुक्त होण्याच्या कारणाकरिता खोटे निवेदन करील किंवा खोट्या लेखांचा उपयोग करील तीस किंवा
२) जो कोणताही पोलीस अधिकारी,-
अ) भित्रेपणाबद्दल दोषी असेल, किंवा
ब) कलम २९ चे उल्लंघन करुन आपल्या पदाचा राजीनामा देईल किंवा आपली कामे करणार नाही; किंवा
क) विधीच्या किंवा कोणत्याही नियमाच्या किंवा आदेशाच्या ज्या उपबंधाचे पालन करणे किंवा मानणे हे पोलीस अधिकारी म्हणून त्याचे कर्तव्य असेल त्या उपबंधाचा जाणूनबुजून भंग केल्याबद्दल किंवा त्यात हयगय केल्याबद्दल दोषी असेल त्यास, अपराधसिद्धीनंतर तीन महिनेपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची कैदेची शिक्षा किंवा शंभर रुपयांपर्यंत असू शकेल अशी दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
रजेवरुन परत कामावर हजर होण्यात कसूर करणे.
३) रजेवरुन परत कामावर हजर होण्यात कसूर करणे. जो कोणताही रजेवर गेलेला पोलीस अधिकारी, अशी रजा संपल्यावर वाजवी कारणाशिवाय कामावर स्वत: हजर होण्यात कसूर करील, त्याने पोटकलम (२), खंड (ब) च्या कारणासाठी कलम २९ च्या अर्थानुसार आपल्या पदाचे काम करण्याचे सोडून दिले आहे असे समजण्यात येईल.

Leave a Reply