Bp act कलम १४३-ब: धोक्याचे प्रयोग:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १४३-ब:
धोक्याचे प्रयोग:
१) कोणतीही व्यक्ती यथास्थिती, आयुक्ताच्या किंवा जिल्हा दंडाधिकाऱ्याच्या आगाऊ परवानगीवाचून आणि ज्या शर्तीस अधीन ठेवून अशी परवानगी देण्यात आली असेल त्या कोणत्याही शर्तीप्रमाणे असेल ते खेरीज करुन, माणसे जमण्याचा संभव असेल अशा कोणत्याही ठिकाणी, ज्या प्रयोगात तीस हवा मिळण्याचे सर्व मार्ग बंद होतील अशा रीतीने व श्वास कोंडल्यामुळे सामान्यत: मृत्यू घडेल इतका वेळ स्वत:स जमिनीखाली पुरुन घेईल किंवा कोणत्याही बंदिस्त खोलीत किंवा पात्रात किंवा इतर वस्तूत स्वत:स कोंडून घेईल असा कोणताही प्रयोग करणार नाही.
२) जर कोणतीही व्यक्ती या कलमाच्या उपबंधाचे उल्लंघन करील किंवा उल्लंघन करण्याचा प्रयत्न करील तर, तीस अपराधसिद्धीनंतर एक वर्षांपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कारावासाची शिक्षा किंवा दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
३) २.(फौजदारी प्रक्रिया संहिता, १८९८) यात, काहीही असले तरी या कलमाखाली शिक्षापात्र अपराध हा दखली असेल.)
——–
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ३४ याच्या कलम ३१, अनुसूची अन्वये कलम १४३ख समाविष्ट करण्यात आले.
२. आता फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ (१९७४ चा २) पहा.

Leave a Reply