महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १४३-अ :
१.(कलम ६३अ अन्वये दिलेल्या आदेशाच उल्लंघन केल्याबद्दल शिक्षा:
१) जो कोणी कलम ६३ अ च्या पोटकलम (१) अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन करील त्यास, अपराधसिद्धीनंतर, एक वर्षेपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीची अशी कैदेची शिक्षा किंवा दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होतील.
२) जो कोणी कलम ६३-अ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेल्या कोणत्याही आदेशाचे उल्लंघन करील त्यास, अपराधसिद्धीनंतर, तीन वर्षेपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कैदेची शिक्षा किंवा दंडाची शिक्षा किंवा दोन्ही शिक्षा होतील.)
——–
१. सन १९५३ चा मुंबई अधिनियक क्रमांक २० याच्या कलम १६ अन्वये कलम १४३क समाविष्ट करण्यात आले.