महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १३९ :
कलम ४३ अन्वये केलेल्या नियमांचा भंग-शिक्षा:
जो कोणी, कलम ४३ अन्वये केलेल्या कोणत्याही विनियमाचे उल्लंघन करील किंवा उल्लंघनाची अपप्रेरणा देईल त्यास, अपराधसिद्धीनंतर, तीन महिनेपर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा किंवा १.(दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत) असू शकेल अशी दंडाची शिक्षा होईल किंवा ह्या दोन्ही शिक्षा होतील.
——–
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३५ अन्वये दोनशे रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.