महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १३७ :
कलम ४१ अन्वये केलेले नियम आदेशांचे उल्लंघन शिक्षा :
जो कोणी, कलम ४१ अन्वये पोलिसांनी दिलेल्या कोणत्याही निदेशास विरोध करील किंवा त्यानुसार वागण्यात कसूर करील त्यास, अपराधसिद्धीनंतर १.(पाचशे रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल.
——–
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३४ अन्वये दोनशे रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.