महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १३६ :
कलम ३८ अन्वये केलेले नियम वगैरेंचा भंग शिक्षा:
जो कोणी, कलम ३८ अन्वये वैधरीत्या दिलेल्या कोणत्याही निदेशाचे पालन करणार नाही किंवा तो पालन न करण्याची अपप्रेरणा देईल त्यास, अपराधसिद्धीनंतर तीन महिनेपर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा किंवा १.(पाच हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतक्या दंडाची शिक्षा किंवा या दोन्हीही शिक्षा होतील.
——–
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३३ अन्वये पाचशे रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.