महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १३५ :
कलम ३७, ३९ किंवा ४० अन्वये केलेले नियम आदेश भंग केल्यास शिक्षा :
जो कोणी, कलम ३७, ३९ किंवा ४० अन्वये वैधरीत्या केलेल्या एखाद्या आदेशाचे पालन करणार नाही किंवा त्याचे पालन न करण्याची अपप्रेरणा देईल त्यास, अपराधसिद्धीनंतर –
(एक) पाळण्यात न आलेला किंवा ज्याचे पालन करण्याची अपप्रेरणा दिलेली असेल असा आदेश कलम ३७ च्या पोटकलम(१) अन्वये किंवा कलम ३९ किंवा कलम ४० अन्वये दिलेला असेल तर, एक वर्षापर्यंत असू शकेल अशी कैदची शिक्षा होईल, परंतु ती लेखी नमूद करायच्या कारणाखेरीज, चार महिन्यांपेक्षा कमी असणार नाही आणि तो दंडाच्या शिक्षेसही पात्र असेल आणि
(दोन) जर उक्त आदेश कलम ३७ च्या पोटकलम (२) अन्वये दिलेला असेल, तर एक महिन्यापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या कैदेची किंवा १.(दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत) वाढविता येऊ असू शकेल अशी दंडाची शिक्षा होईल आणि
(तीन) जर उक्त आदेश कलम ३७ च्या पोटकलम (३) अन्वये दिलेला असेल तर,२.(दोन हजार पाचशे रुपयांपर्यंत) वाढविता येऊ असू शकेल अशी दंडाची शिक्षा होईल.
———
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३२ (अ) अन्वये शंभर रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम ३२ (ब) अन्वये शंभर रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.