Bp act कलम १३२ : कलम ३१ च्या आदेशभंगाबद्दल शिक्षा :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १३२ :
कलम ३१ च्या आदेशभंगाबद्दल शिक्षा :
जो कोणी, कोणतीही जागा रिकामी करण्यास त्यास भाग पाडणाऱ्या कलम ३१ खालील एखाद्या आदेशाचे उल्लंघन करील, तो आदेश पाळणार नाही, त्यास विरोध करील किंवा त्याप्रमाणे वागण्यात कसूर करील त्यास, अपराधसिद्धीनंतर तीन महिनेपर्यंत वाढविता येऊ शकेल अशी कैदेची शिक्षा किंवा १.(पाच हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतक्या दंडाची शिक्षा किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
——–
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २९ अन्वये पाचशे रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply