Bp act कलम १३१ : कलम ३३ प्रमाणे केलेले नियम वगैरेंचे उल्लंघन शिक्षा :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १३१ :
कलम ३३ प्रमाणे केलेले नियम वगैरेंचे उल्लंघन शिक्षा :
१.(२.(कलम १३१ अ मध्ये अन्यथा उपबंधित केले असेल त्याव्यतिरिक्त, जो कोणी -)
अ) कलम ३३ अन्वये केलेले कोणतेही नियम किंवा आदेश किंवा अशा नियमान्वये किंवा आदेशान्वये दिलेल्या लायसेन्सच्या कोणत्याही शर्तींचे उल्लंघन करील किंवा,
ब) खंड (१) खालील कोणताही अपराध करण्यास अपप्रेरणा देईल, त्यास, अपराधसिद्धीनंतर-)
एक) ज्या नियमान्वये किंवा आदेशान्वये उक्त लायसेन्स देण्यात आले होते तो नियम किंवा आदेश जर कलम ३३ च्या पोटकलम (१) च्या खंड (ड), (ग), (ह), (आय), खंड (र) च्या उपखंड (१) आणि (२) किंवा खंड (यू) अन्वये केलेला असेल तर, आठ दिवसांपर्यंत असू शकेल अशा मुदतीच्या कैदेची किंवा खंड (यू) अन्वये केलेला असेल तर, आठ दिवसांपर्यंत असू शकेल अशा मुदतीच्या कैदेची किंवा ३.(एक हजार दोनशे पन्नास रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
४.(एक-अ) ज्या नियमाद्वारे किंवा आदेशान्वये उक्त लायसेन्स देण्यात आले असेल तो नियम किंवा आदेश जर कलम ३३ च्या पोटकलमाच्या खंड (२) चा उपखंड (तीन) अन्वये केलेली असेल तर तीन महिन्यापर्यंत असू शकेल इतक्या कारावासाची किंवा दोन हजार रुपयांपर्यंतच्या द्रव्यदंडाची किंवा या दोन्ही शिक्षा होतील.)
दोन) उल्लंघन करण्यात आलेला नियम किंवा आदेश कलम ३३ च्या पोटकलम (१) च्या खंड ५.((डब्ल्य ब) किंवा (एक्स)) अन्वये केलेला असेल तर तीन महिने मुदतीपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या कैदेची शिक्षा किंवा ६.(बारा हजार पाचशे रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
तीन) उल्लंघन करण्यात आलेला नियम किंवा आदेश किंवा ज्या नियमान्वये किंवा आदेशान्वये उक्त लायसेन्स देण्यात आले तो नियम किंवा आदेश कलम ३३ च्या पोटकलम (१) च्या खंड (न) व (ओ) अन्वये केलेला असेल तर ७.(पाच हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतक्या द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
चार) उल्लंघन करण्यात आलेला नियम किंवा आदेश कलम ३३ च्या पोट-कलम (१) च्या खंड (ब) अन्वये करण्यात आलेला आणि त्या अन्वये वाहतुकीस अडथळ होईल किंवा लोकांची गैरसोय होईल अशा रीतीने कोणत्याही रस्त्यावर किंवा त्याच्या भागांवर कोणताही माल विकण्यास किंवा विकण्यासाठी मांडून ठेवण्यास मनाई करण्यात आली असेल तर त्यास-
अ) पहिल्या अपराधाबद्दल एक महिन्यापर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीच्या कैदेची शिक्षा किंवा ८.(दोन हजार पाचशे रुपयांपर्यंतची) वाढविता येऊ शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल किंवा दोन्ही होतील, आणि
ब) नंतरच्या अपराधाबद्दल सहा महिनेपर्यंत वाढविता येऊ शकेल इतक्या मुदतीया कैदेची शिक्षा किंवा ९.(पाच हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतकया द्रव्यदंडाची शिक्षा होईल; आणि
(पाच) उल्लंघन करण्यात आलेला नियम किंवा आदेश किंवा ज्या नियमान्वये किंवा आदेशान्वये उक्त लायसेन्स देण्यात आले असेल तो नियम किंवा आदेश १०.(कलम ३३ पोट-कलम (१) च्या कोणत्याही खंडान्वये केलेला असेल आणि ज्याच्या उल्लंघनाबद्दल या कलमान्वये कोणत्याही शीस्तीची तरतूद करण्यात आलेली नसेल) तर ११.(पाचशे रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतक्या दंडाची शिक्षा होईल.
——-
१. सन १९५४ चा मुबंई अधिनियम क्रमांक २१ याच्या कलम ३, दुसऱ्या अनुसूची अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक २८ याच्या कलम १० अन्वये जो कोणी या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
३. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २७ (अ) अन्वये पन्नास रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
४. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २७ (ब) अन्वये हा उपखंड समाविष्ट करण्यात आले.
५. सन १९७४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १ याच्या कलम ४ अन्वये मूळ मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
६. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २७ (क) अन्वये पाचशे रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
७. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २७ (ड) अन्वये दोनशे रुपयांपर्यत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
८. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २७ (इ) (१) अन्वये दोनशे रुपयांपर्यत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
९. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २७ (इ) (२) अन्वये पाचशे रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
१०. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३० याच्या कलम २ अन्वये इतर कोणत्याही खंडान्वये देण्यात आला असेल या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
११. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २७ (फ) अन्वये पन्नास रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply