महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १२८ :
अल्पवयी मुलाकडून तारण घेणे :
जो कोणी, चौदा वर्षापेक्षा जास्त वयाचा दिसत नसेल अशा कोणत्याही मुलाकडून कोणत्याही प्रकारची वस्तू, त्या मुलास उसने दिलेल्या, आगाऊ दिलेल्या किंवा त्याच्या स्वाधीन केलेल्या कोणत्याही रकमेबद्दल तारण किंवा प्रतिभूती म्हणून देईल किंवा अशा वस्तूच्या मालकाच्या नकळत व संमतीवाचून ती वस्तू अशा मुलाकडून विकत घेईल त्यास अपराधसिद्ध म्हणतात १.(दोन हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतकया द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
——–
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २४ अन्वये शंभर रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.