महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १२७ :
अशी मालमत्ता वितळविणे वैगेरे:
जो कोणी, कलम १२६ मध्ये उल्लेख केल्याप्रमाणे माहिती मिळाल्यानंतर, पोलिसांची आगाऊ परवानगी घेतल्यावाचून अशा कोणत्याही मालमत्तेतफेरफार करणे, ती वितळवणे, विरुपित करणे किंवा लांबवणे या गोष्टी करील, करवील किंवा चालवून घेईल त्यास, ती मालमत्ता, भारतीय दंड संहिता, कलम ४१० च्या अर्थाप्रमाणे चोरीची मालमत्ता असल्याचे किंवा जिच्या बाबतीत उक्त संहितेच्या कलमे ४१७, ४१८, ४१९ किंवा ४२० अन्वये शिक्षापात्र असा कोणताही अपराध घडला आहे असे, सिद्ध झाले असता, तीन वर्षेपर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा किंवा दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.