महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १२५ :
सरकारी रुग्णालयात-बराकीत-लढाऊ जहाजावर स्पिरीट वगैरे घेऊन जाणे:
जो कोणी,-
अ) कोणत्याही सरकारी रुग्णालयात अशा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या परवानगीवाचून, कोणतीही दारु किंवा दारु असलेली किंवा आंबवलेली मादक द्रव्ये किंवा मादक औषधी किंवा कैफआणणारे तयार केलेले पदार्थ घेऊन जाईल किंवा घेऊन जाण्याचा प्रयत्न करील किंवा आणील किंवा आणण्याचा प्रयत्न करील, किंवा
ब) सेना नियमावली (आर्टिकल्स ऑफवॉर) ज्यास लागू आहे असा नसून अराजदिष्ट अधिकाऱ्याच्या दर्जावरील कोणत्याही व्यक्तीच्या मालकीची नाही अशी कोणतीही दारु, मादक द्रव्ये, औषधी किंवा तयार केलेले पदार्थ,-
(एक) मुंबईच्या दुर्गरक्षक सेनेचा भाग होणाऱ्या सेनेच्या भोगवट्यात असलेल्या बराकीत किंवा इमारतीत किंवा कोणत्याही लष्करी बराकीत, रक्षक चौकीत किंवा छावणीमध्ये किंवा
(दोन) सरकारच्या मालकीच्या कोणत्याही लढाऊ जहाजावर किंवा तशा जहाजाच्या बाजूस घेऊन जाईल किंवा घेऊन जाण्याचा प्रयत्न करील किंवा आणील किंवा आणण्याचा प्रयत्न करील त्यास, अपराधसिद्धीनंतर दोन महिनेपर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा किंवा १.(तीन हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतकया द्रव्यदंडाची शिक्षा किंवा ह्या दोन्ही शिक्षा होतील आणि अशी दारु, मादक द्रव्य, मादक औषधी किंवा तयार केलेले मादत पदार्थ आणि ते ज्यात ठेवलेले असतील ती पात्रे राज्यशासनाकडे जमा करण्यात येतील.
———
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २२ अन्वये शंभर रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.