Bp act कलम १२४ : ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता ताब्यात असणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १२४ :
ज्या मालमत्तेबद्दल कोणतेही समाधानकारक स्पष्टीकरण देता येत नाही अशी मालमत्ता ताब्यात असणे :
जी मालमत्ता चोरलेली किंवा लबाडीने मिळविलेली आहे असे सकारण वाटत असेल अशी कोणतीही वस्तू ज्या कोणाच्या ताब्यात असेल किंवा जो कोणत्याही रीतीने नेत असेल किंवा विकण्यास किंवा गहाण ठेवण्यास काढीत असेल त्यास, अशी वस्तू ताब्यात बाळगण्याबद्दलचे किंवा तसे कृत्य करण्याबद्दलचे कारण तो दंडधिकाऱ्याचे समाधान होईल अशा रीतीने देणार नाही तर त्यास, अपराधसिद्धीनंतर १.(एक वर्ष मुदतीपर्यंतची) असेल अशी परंतु लेखी नमूद करावयाच्या कारणांखेरीज जी एक महिन्यापेक्षा कमी नसेल इतक्या मुदतीपर्यंतची असेल अशी कैदेची शिक्षा होईल आणि तो २.(पाच हचार रुपयांपर्यंत ) दंडाच्या शिक्षेससुद्धा पात्र असेल.
——–
१. सन १९७० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९ याच्या कलम ५ अन्वये तीन महिन्यांपर्यंत असू शकेल इतक्या कैदीची किंवा १०० रुपयांपर्यंतच्या दंडाची किंवा दोन्ही या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम २१ अन्वये पाचशे रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply