महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १२२ :
सूर्यास्त व सूर्योदय यांचे दरम्यान संशायास्पद स्थितीत सापडणे :
जो कोणी, सूर्यास्त किंवा सूर्योदय यांच्या दरम्यान –
अ) एखादा अपराध करण्याच्या उद्देशाने कोणत्याही भयंकर हत्यारानिशी किंवा
ब) एखादा अपराध करण्याच्या उद्देशाने आपला चेहरा झाकून किंवा इतर रीतीने वेष पालटून किंवा
क) कोणत्याही राहत्या घरात किंवा इतर इमारतीत किंवा कोणत्याही जहाजावर किंवा होडीवर त्या ठिकाणी असल्याबद्दल समाधानकारक कारण दाखविण्यास असमर्थ असून तेथे हजर राहिलेला किंवा
ड) प्रसिद्धी पावलेला चोर असून कोणत्याही रस्त्यावर, आवारात किंवा इतर जागी पडून असलेला किंवा भटकत असलेला आणि स्वत:बद्दल समाधानकारक माहिती देण्यास असमर्थ असा किंवा
इ) वैध सबबीवाचून (ही सबब सिद्ध करण्याची जबाबदारी अशा व्यक्तीवर राहील) १.(घरफोडीचे कोणतेही हत्यार जवळ बाळगलेल्या स्थितीत आढळून येईल, त्यास अपराध सिद्धीनंतर जी एक वर्ष मुदतीपर्यंतची असेल अशी, परंतु लेखी नमूद करावयाच्या कारणांखेरीज जी एक महिन्यांपेक्षा कमी नसेल इतक्या मुदतीची असेल अशी कैदेची शिक्षा होईल. तसेच तो २.(एक हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतकया द्रव्यदंडाची शिक्षेससुद्धा पात्र असेल.)
——–
१. सन १९७० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २९ च्या कलम ४ अन्वये घर फोडीचे कोणतेही हत्यार बाळगलेल्या स्थितीत या मजकुराने सरु होणाऱ्या व कैदेची शिक्षा होईल या मजकुराने समाप्त होणाऱ्या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १९ अन्वये पाचशे रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.