महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १२१ :
आगीची – खोटी बातमी देणे:
जी कोणी व्यक्ती नगरपालिकेच्या किंवा महानगरपालिकेच्या अग्निशामक पथकास किंवा त्याच्या कोणत्याही अधिकाऱ्यास किंवा आगवल्यास (फारयमन) रस्त्यातील आगीची सूचना देणाऱ्या यंत्राद्वारे निवेदन करुन, संदेशाद्वारे किंवा इतर रीतीने, जाणूनबुजून रस्त्यावरील आगीची सूचना देणाऱ्या यंत्राची काच फोडील किंवा इतर रीतीने त्यास नुकसान पोहोचवील तिला, अपराधसिद्धीनंतर तीन महिन्यापर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा होईल किंवा १.(तीन हजार रुपये) पर्यंतची दंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
———
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १८ अन्वये शंभर रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.