महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १२० :
जाणून-बुजून अतिक्रमण करणे:
जी कोणी व्यक्ती समाधानकारक सबबीवाचून, कोणतेही राहण्याचे घर किंवा जागा किंवा त्याला जोडलेली कोणतीही जमीन किंवा भूमी यात किंवा यावर किंवा शासनाच्या मालकीची किंवा सार्वजनिक कारणांसाठी उपयोग करण्यासाठी राखून ठेवलेली कोणतीही जागा, इमारत, स्मारक किंवा बांधकाम यांवर किंवा होडी किंवा जहाज यांवर जाणूनबुजून प्रवेश करील किंवा राहील, मग त्याजकडून वस्तुत: कोणतेही नुकसान झालेले असो वा नसो, तीस, अपराधसिद्धीनंतर १.(पाच हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतकया द्रव्यदंडाची शिक्षा होईल.
———
१. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १७ अन्वये वीस रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.