Bp act कलम ११९ : प्राण्यास निर्दयतेने वागविल्याबद्दल शिक्षा:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ११९ :
प्राण्यास निर्दयतेने वागविल्याबद्दल शिक्षा:
जी कोणतीही व्यक्ती, १.(ज्या क्षेत्रासाठी आयुक्ताची नेमणूक करण्यात आलेली नाही अशा कोणत्याही क्षेत्रामधील) कोणत्याही जागेतील कोणत्याही प्राण्यास निर्दयपणे मारील, मारावयास लावील किंवा मार बसेल असे घडवून आणील किंवा त्यास निर्दयपणे वाईट रीतीने वागवील किंवा तसे वाईट रीतीने वागविले जाईल असे घडवून आणील किंवा त्याचे निर्दयपणे हाल करील किंवा करवील किंवा तसे हाल केले जातील असे घडवून आणील तीस, अपराधसिद्धीनंतर एक महिन्यापर्यंत असू शकेल अशी कैदेची शिक्षा होईल किंवा २.(अडीच हजार रुपयांपर्यंत) वाढविता येऊ शकेल इतकया द्रव्यदंडाची शिक्षा होईल किंवा या दोन्ही शिक्षा होतील.
——–
१. सन १९५९ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये बृहन्मुंबई बाहेरील या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.
२. सन २००० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४० याच्या कलम १६ अन्वये शंभर रुपयांपर्यंत या मजकुराऐवजी समाविष्ट करण्यात आले.

Leave a Reply