महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ११६ :
सार्वजनिक इमारतीमधील नोटिसीकडे दुर्लक्ष करणे:
कोणतीही व्यक्ती कोणत्याही न्यायालयात, पोलीस ठाण्यात, पोलीस कार्यालयात शासनाच्या किंवा कोणत्याही सार्वजनिक संस्थेच्या भोगवट्यातील इमारतीत अशा जागेच्या प्रभारी सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेल्या आणि अशा न्यायालयात, ठाण्यात, कार्यालयात किंवा इमारतीत लावलेल्या नोटिसांचे उल्लंघन करुन, तंबाखू ओढणार नाही किंवा थुंकणार नाही.