महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ११५ :
रस्ता वगैरेंच्या मध्ये किंवा जवळ उपद्रव करणे:
कोणतीही व्यक्ती कोणत्याही रस्त्यात किंवा रस्त्याजवळ, सार्वजनिक जागेत किंवा जागेजवळ किंवा सार्वजनिक स्थळी किंवा अशा स्थळाजवळ,-
अ) मलमूत्र विसर्जन करुन उपद्रव करणार नाही, किंवा
ब) आपल्या ताब्यात किंवा अभिरक्षेत असलेल्या सात वर्षांच्या वयाखालील कोणत्याही मुलांकडून उपरीनिर्दिष्ट उपद्रव होऊ देणार नाही, १. (किंवा
क) ज्यामुळे कोणत्याही जाणाऱ्या-येणाऱ्या व्यक्तीस त्रास होईल अशा रीतीने थुंकणार नाही किंवा कोणतीही धूळ,राख,केर किंवा कचरा टाकणार नाही).
——–
१. सन १९५६ चा मुंबई अधिनियम क्रमांक १ याच्या कलम १२ अन्वये समाविष्ट करण्यात आले.