महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम ११० :
लोकांसमोर असभ्य वर्तन करणे:
कोणतीही व्यक्ती, कोणत्याही रस्त्यात किंवा सार्वजनिक जागेत किंवा कोणत्याही रस्त्यातून किंवा सार्वजनिक जागेतून दृष्टीस पडेल अशाप्रकारे व दिसेल अशा रीतीने, मग कोणतेही घर किंवा इमारत यातून असो वा नसो, जाणूनबुजून व निर्लज्जपणे आपले शरीर उघडे टाकणार नाही किंवा कोणत्याही रस्त्यात किंवा लोकांच्या येण्याजाण्याच्या जागी किंवा कोणत्याही कार्यालयात, स्टेशनात किंवा स्टेशनाच्या इमारतीत असभ्य भाषा वापरणार नाही किंवा असभ्य रीतीने किंवा दांडगाईने किंवा गैरशिस्तीने वागणार नाही.