महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १० :
आयुक्ताच्या हाताखाली उपआयुक्त (डेप्युटी कमिशनर)१.(***) :
१) राज्य शासनाला, बृहन्मुंबईत किंवा ज्या क्षेत्रात कलम ७, खंड (अ) अन्वये आयुक्त नेमण्यात आलेला असेल अशा कोणत्याही क्षेत्रात एक किंवा अनेक पोलीस उपआयुक्त २.(***) नेमता येतील.
२) असा प्रत्येक उप आयुक्त ३.(***) आयुक्ताच्या आदेशानुसार ४.(***) या अधिनियमाच्या उपबंधांन्वये किंवा त्या त्या वेळी अमलात असलेल्या कोणत्याही इतर विधीअन्वये त्याने वापरावयाच्या आयुक्तांच्या शक्ती पार पाडावयाची कामे व कर्तव्ये यांपैकी कोणत्याही शक्तींचा वापर करील व कोणतीही कामे व कर्तव्ये पार पाडील:
परंतु असे की, ५.(कलम ३३ अन्वये नियम करणे, त्यांतफेरफार करणे किंवा ते विखंडित करणे यासंबंधी) आयुक्ताने वापरावयाच्या अधिकाराचा उप आयुक्त यास ३.(***) वापरता येणार नाहीत.
——–
१. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये व सहाय्यक आयुक्त हा मजकूर वगळण्यात आला.
२. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये आणि एक किंवा अनेक सहायक पोलीस आयुक्त हा मजकूर वगळण्यात आला.
३. सन १९६२ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये किंवा सहाय्यक कमिशनराने व किंवा सहाय्यक कमिशन हा मजकूर वगळण्यात आला.
४. सन १९९४ चा महाराष्ट अधिनियम क्रमांक ३७ याच्या कलम २ अन्वये याबाबत केलेल्या राज्य शासनाच्या सर्वसाधारण किंवा विशेष आदेशास अनुसरुन हा मजकूर वगळण्यात आला व तो नेहमीकरिता वगळण्यात आलेला असल्याचे मानन्या येईल.
५. सन १९५४ चा मुंबई अधिनियम क्रमांक ५६ याच्या कलम ३, अनुसूची अन्वये मूळ मजकूराऐवजी समाविष्ट करण्यात आले.