महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १०६ :
घोडे वगैरे मोकळे सोडणे, हिंस्त्र कुत्रे मोकळे राहू देणे:
कोणतीही व्यक्ती कोणत्याही रस्त्यात किंवा सार्वजनिक जागेत-
अ) कोणत्याही घोड्यास किंवा इतर प्राण्यास धोका, इजा, भय किंवा त्रास होईल अशा रीतीने हयगयीने माकळे सोडणार नाही किंवा कोणत्याही हिंस्त्र कुत्र्यास मुसक्या बांधल्यावाचून मोकळे राहू देणार नाही, किंवा-
ब) कोणत्याही व्यक्तीवर किंवा घोड्यावर किंवा इतर प्राण्यावर चालून जाण्यासाठी त्यास त्रास देण्यासाठी किंवा भिवविण्यासाठी कोणत्याही कुत्र्यास किंवा इतर प्राण्यांस अंगावर सोडणार नाही.