महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १०४ :
नकलांचे, गायनवादनाचे किंवा इतर प्रकारचे खेळ करणे:
१.(महसूल आयुक्त किंवा आयुक्त) किंवा यथास्थिती, जिल्हा दंडाधिकारी याने केलेल्या आणि अधिसूचित केलेल्या कोणत्याही विनियमाविरुद्ध, कोणतीही व्यक्ती, कोणत्याही रस्त्यामध्ये किंवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी जमेल अशा प्रकारचे कोणतेही नकलांचे, गायनवादनाचे किंवा इतर प्रकारचे खेळ करुन दाखविणार नाही किंवा जाणाऱ्या येणाऱ्या लोकांना अडथळा होईल किंवा रहिवाशांना त्रास होईल अशा मोठ्या जाहिराती, चित्र, आकृत्या किंवा चिन्हे नेणार नाही किंवा तेथे ठेवणार नाही.
——–
१ सन १९६० चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २ याच्या कलम ५ अन्वये कमिशनर या शब्दाऐवजी हा मजकुर समाविष्ट करण्यात आला.