Bp act कलम १०२ : रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण करणे:

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १०२ :
रस्त्यावर कोणताही अडथळा निर्माण करणे:
कोणतीही व्यक्ती कोणत्याही सडकेत किंवा सार्वजनिक जागी, ज्या कोणत्याही प्राण्यावर किंवा वाहनात ओझे लादावयाचे आहे किंवा ओझे उतरावयाचे असेल किंवा उतारु घ्यावयाचे किंवा उतरावयाचे असतील त्या प्राण्यास किंवा वाहनास, अशा कामासाठी आवश्यक असेल अशा वेळेपेक्षा अधिक वेळ राहू देऊन किंवा उभे करुन किंवा त्या ठिकाणी कोणतेही वाहन उभे ठेवून किंवा कोणतीही गुरे बांधून किंवा रस्त्याच्या किंवा सार्वजनिक जागेच्या कोणत्याही भागाचा वाहनासाठी किंवा गुरांसाठी थांबण्याच्या ठिकाणासाठी उपयोग करुन किंवा रस्त्यात किंवा रस्त्यावर कोणतीही पेटी, गठ्ठा, गासडी किंवा इतर कोणतीही वस्तू गैरवाजवी वेळेपर्यंत राहू देऊन किंवा सक्षम प्राधिकाऱ्याने तयार केलेल्या व प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही विनियमाविरुद्ध कोणतेही दुकान, छप्पर, फळी, पिंप, टोपली यांत किंवा यावर कोणतीही वस्तू विकावयास ठेवून किंवा मांडून किंवा इतर कोणत्याही रीतीने कोणत्याही सडकेत अडथळा निर्माण करणार नाही.

Leave a Reply