महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १०१ :
प्राणी भाड्याने देण्याकरता विक्रीकरता वगैर ठेवणे :
कोणतीही व्यक्ती कोणत्याही रस्त्यावर किंवा सार्वजनिक जागेत रहदारीस गंभीर स्वरुपाचा अडथळा होईल किंवा तेथे राहणारांना किंवा लोकांना फार त्रास होईल अशा रीतीने, सक्षम प्राधिकारी परवानगी देऊन त्या वेळेखेरीज त्या ठिकाणाखेरीज कोणताही फर्निचर किंवा वाहन स्वच्छ करणार नाही किंवा कोणताही घोडा किंवा इतर प्राणी धुणार नाही किंवा त्यास खरारा करणार नाही किंवा कोणत्याही घोड्यास किंवा प्राण्यास शिकविणार नाही किंवा वठणीवर आणणार नाही किंवा कोणतेही वाहन किंवा वाहनाचा भाग तयार करणार नाही किंवा एखाद्या अपघाताच्या प्रसंगी जागचे जागी दुरुस्त करणे आवश्यक असेल ते खेरीजकरुन, कोणतेही वाहन किंवा वाहनाचा भाग दुरुस्त करणार नाही किंवा त्यात कोणतेही उत्पादन कार्य किंवा काम चालू करणार नाही.