Bp act कलम १०० : प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे :

महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१
कलम १०० :
प्राण्यांकडून अडथळा किंवा खोडी करविणे :
कोणतीही व्यक्ती,-
(एक) कोणताही प्राणी किंवा वाहन हाकताना, सांभाळताना, त्याची काळजी घेताना कोणत्याही प्रकारच्या गैरवर्तनाने, निष्काळजीपणाने किंवा वाईट रीतीने वागविण्याने;
(दोन) इमारती लाकडे, काठ्या, किंवा इतर अवजड वस्तू यांनी लादलेले कोणतेही वाहन किंवा प्राणी या बाबतीत सक्षम प्राधिकाऱ्याने केलेल्या व प्रसिद्ध केलेल्या कोणत्याही विनियमाविरुद्ध सडकेवरुन किंवा सार्वजनिक जागेमधून हाकण्याने, कोणत्याही सडकेवर किंवा सार्वजनिक जागेत अडथळा, नुकसान, इजा, धोका, भय किंवा खाडी यांस कारणीभूत होणार नाही.

Leave a Reply