भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ९७ :
ज्या जागेत चोरीचा माल – बनावट दस्तैवज वगैरे असल्याचा संशय आहे त्या जागेची झडती :
१) जर खबर मिळाल्यावरून आपणांस जरूर वाटेल अशा चौकशीनंतर, जिल्हा दंडाधिकाऱ्याला, उपविभागीय दंडाधिकाऱ्याला किंवा प्रथम वर्ग दंडाधिकाऱ्याला एखादी जागा चोरीची मालमत्ता ठेवण्यासाठी, किंवा ती विकण्यासाठी अथवा हे कलम जिला लागू आहे अशी कोणतीही आक्षेपार्ह वस्तू ठेवण्यासाठी, विकण्यासाठी किंवा तिचे उत्पादन करण्यासाठी वापरली जात आहे किंवा अशी कोणतीही आक्षेपार्ह वस्तू एखाद्या जागी ठेवण्यात आली आहे असे सकारण वाटत असेल तर, तो वॉरंटाव्दारे पोलीस शिपायाहून वरच्या दर्जाच्या कोणत्याही पोलीस अधिकाऱ्याला,-
(a) क) (अ) आवश्यक त्या साहाय्यानिशी अशा जागी प्रवेश करण्यास,
(b) ख) (ब) वॉरंटात विनिर्दिष्ट केलेल्या रीतीने त्या जागेची झडती घेण्यास,
(c) ग) (क) त्या ठिकाणी सापडलेली जी कोणतीही मालमत्ता किंवा वस्तू ही चोरीची मालमत्ता असल्याचा किंवा जिला हे कलम लागू होते अशी आक्षेपार्ह वस्तू असल्याचा त्याला वाजवी संशय येईल ती कब्जात घेण्यास,
(d) घ) (ड) अशी मालमत्ता किंवा वस्तू दंडाधिकाऱ्यासमोर नेण्यास किंवा अपराध्याला दंडाधिकाऱ्यासमोर नेले जाईपर्यंत त्याच जागी तिची राखण करण्यास किंवा कोणत्याही सुरक्षित स्थळी तिची अन्य प्रकारे विल्हेवाट करण्यास,
(e) ङ) (इ) अशा जागी सापडलेली जी व्यक्ती अशी कोणतीही मालमत्ता किंवा वस्तू ही चोरीची मालमत्ता असल्याचे किंवा, प्रकरणपरत्वे, जिला हे कलम लागू आहे अशी आक्षेपार्ह वस्तू असल्याचे माहीत असताना किंवा तसे असल्याचा संशय येण्यास तिला वाजवी कारण असताना, ती ठेवण्याच्या, विकण्याच्या किंवा तिचे उत्पादन करण्याच्या कामी सामील असल्याचे दिसत असेल अशा प्रत्येक व्यक्तीला ताब्यात घेऊन दंडाधिकाऱ्यापुढे नेण्यास, प्राधिकृत करू शकेल.
२) ज्यांना हे कलम लागू होते त्या आक्षेपार्ह वस्तू पुढीलप्रमाणे आहेत :
(a) क) (अ) नकली नाणी;
(b) ख) (ब) नाणे निर्माण अधिनियम २०११ (२०११ चा ११) याचे उल्लंघन करून बनवलेले किंवा सीमाशुल्क अधिनियम, १९६२ (१९६२ चा ५२) याच्या कलम ११ खालील त्या त्या काळी अमलात असलेल्या कोणत्याही अधिसूचनेचे उल्लंघन करून भारतात आणलेले धातूचे नग;
(c) ग) (क) नकली चलनी नोटा; नकली मुद्रांक;
(d) घ) (ड) बनावट दस्तऐवज;
(e) ङ) (इ) खोटया मोहोरा;
(f) च) (फ) भारतीय न्याय संहिता २०२३ यातील कलम २९४ मध्ये निर्दिष्ट केलेल्या अश्लील वस्तु;
(g) छ) (ग) खंड (क) अ) (a)ते (च) फ)(f)मध्ये उल्लेखिलेल्यापैकी कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्यासाठी वापरली जाणारी उपकरणे किंवा सामग्री.
