भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
प्रकरण २ :
फौजदारी न्यायालय व अधिकारपदे घटित करणे :
कलम ६ :
फौजदारी न्यायालयांचे वर्ग :
उच्च न्यायालये व या संहितेहून अन्य कोणत्याही कायद्याव्दारे घटित झालेली न्यायालये याशिवाय, प्रत्येक राज्यात पुढील प्रकारची
फौजदारी न्यायलये असतील. ती अशी-
एक) सत्र न्यायलये ;
दोन) प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी;
तीन) व्दितीय वर्ग न्याय दंडाधिकारी; आणि
चार) कार्यकारी दंडाधिकारी.