Bnss कलम ६६ : समन्सातील व्यक्ती सापडत नसेल तेव्हा बजावणी :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ६६ :
समन्सातील व्यक्ती सापडत नसेल तेव्हा बजावणी :
जिला समन्स पाठवलेले असेल ती व्यक्ती यथायोग्य तत्परता दाखवल्यावरही सापडू शकत नसेल तर, तिच्या कुटुंबाचा घटक असलेला जो एखादा प्रौढ तिच्याबरोबर राहत असेल त्याच्याकडे दोन प्रतिलिप्यांपैकी एक त्या व्यक्तीकरता ठेवून समन्स बजावता येईल, व ज्या व्यक्तीकडे समन्स याप्रमाणे ठेवून देण्यात येईल त्या व्यक्तीला बजावणी करणाऱ्या अधिकाऱ्याने तशी मागणी केल्यास दुसऱ्या प्रतिलिपीच्या मागील बाजूस त्याबद्दलची पोच म्हणून स्वाक्षरी करावी लागेल.
स्पष्टीकरण :
नोकर हा या कलमाच्या अर्थांतर्गत कुटुंबातील घटकव्यक्ती होत नाही.

Leave a Reply