Bnss कलम ५४ : अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ५४ :
अटक करण्यात आलेल्या व्यक्तीची ओळख :
एखाद्या व्यक्तीला एखादा अपराध केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली असेल आणि अशा अपराधाच्या अन्वेषणाच्या प्रयोजनासाठी इतर कोणत्याही व्यक्तीने किंवा व्यक्तींनी ओळखणे आवश्यक असेल तेथे, त्या भागात अधिकारिता असणाऱ्या न्यायालयाला, पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्याच्या विनंतीवरून, अशा प्रकारे अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला, तिने न्यायालयाला योग्य वाटेल अशा रीतीने कोणत्याही व्यक्तीकडून किंवा व्यक्तीकडून ओळख पटविण्यासाठी स्वत:ला अधीन करण्याबाबतचे निदेश देता येतील :
परंतु असे की, अटक करण्यात आलेल्या व्यक्तीला ओळखणारी व्यक्ती मानसिकदृष्ट्या किंवा शारीरिकदृष्ट्या विकलांग असेल तर, ओळख पटविण्याची प्रक्रिया दंडाधिकाऱ्याच्या पर्यवेक्षणाखाली होईल असा दंडाधिकारी, अटक करण्यास आलेल्या ओळखणाऱ्या अशा व्यक्तीला सोयीस्कर होईल अशा पध्दतीचा वापर करण्यात येईल याची सुनिश्चिती करील आणि ओळख पटविण्याच्या प्रक्रियेचे दृकश्राव्य चित्रण (व्हीडिओग्राफी) करुन अभिलिखित करण्यात येईल.

Leave a Reply