भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४८१ :
निकटतम अपील न्यायालयासमोर उपस्थित होण्यासाठी आरोपी व्यक्तीला जामीन देण्यास भाग पाडणे :
१) न्यायचौकशीच्या निर्णयापूर्वी आणि अपील निकालात निघण्यापूर्वी, अपराधाची न्यायचौकशी करणारे न्यायलय किंवा यथास्थिती, अपील न्यायालय, संबंधित न्यायालयाच्या न्यायनिर्णयाविरूद्ध दाखल केलेल्या कोणत्याही अपीलाच्या बाबतीत जेव्हा केव्हा उच्च न्यायालय नोटीस देईल तेव्हा तेव्हा अशा न्यायालयासमोर उपस्थित राहाण्याच्या बाबतीत बन्धपत्र किंवा जामीन बन्धपत्र करून देण्यासाठी आरोपी व्यक्तीला फर्मावील आणि जसे बन्धपत्र सहा महिन्यांसाठी अंमलात असेल.
२) जर अशा आरोपीने उपस्थित राहाण्यात कसूर केली तर, ती प्रतिभूती सरकारजमा होईल आणि कलम ४९१ खालील कार्यपद्धती या बाबतीत लागू होईल.