Bnss कलम ४७९ : न्यायचौकशी चालू असलेल्या कैद्याला जास्तीत जास्त किती कालावधीसाठी अटकावून ठेवता येईल :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४७९ :
न्यायचौकशी चालू असलेल्या कैद्याला जास्तीत जास्त किती कालावधीसाठी अटकावून ठेवता येईल :
१) जर एखादी व्यक्ती, कोणत्याही कायद्याखालील अपराधासाठी (ज्यासाठी त्या कायद्याखालील एक शिक्षा म्हणून मृत्यूची शिक्षा किंवा आजीवन कारावासाची शिक्षा विनिर्दिष्ट केलेली आहे असा अपराध नसलेल्या) व संहितेन्वये अन्वेषण चौकशी किंवा संपरीक्षा चालू असलेल्या कालावधीच्या दरम्यान स्थानबद्द झालेली असेल, जो कालावधी त्या अधिनियामन्वये त्या अपराधासाठी विनिर्दिष्ट केलेल्या कमाल कालावधीच्या अध्र्यांपेक्षा अधिक इतका असेल तर, न्यायालय त्या व्यक्तीला जामीनावर सोडून देईल :
परंतु, जर अशी व्यक्ती प्रथमच अपराधी असेल (ज्याला यापूर्वी कोणत्याही अपराधीसाठी दोषी ठरविले गेले नाही) जर त्याने ज्या कालावधीच्या दरम्यान स्थानबद्ध झालेली असेल, जो कालावधी त्या अधिनियमान्वये त्या अपराधासाठी विनिर्दिष्ट केलेल्या कमाल कालावधीच्या एक तृतीयांशपेक्षा अधिक इतका असेल तर, न्यायालय त्या व्यक्तीला जामीनावर सोडून देईल :
परंतु आणखी असे की, न्यायालय सरकारी अभियोक्त्याचे म्हणणे ऐकल्यावर आणि कारणे लेखी नमूद करून त्या व्यक्तीची स्थानबद्धता उक्त कालावधीच्या अध्र्यापेक्षा अधिक कालावधीसाठी चालू ठेवू शकेल किंवा त्याच्या बंधपत्राशिवाय जामिनावर मुक्त करू शकेल :
परंतु आणखी असे की, अशा कोणत्याही व्यक्तीला, कोणत्याही बाबतीत अन्वेषण, चौकशी किवा संपरीक्षेच्या कालावधीत, त्या कायद्यानवे त्या अपराधाखाली तरतुद केलेल्या कमाल कालावधीपेक्षा अधिक कालावधीसाठी स्थानबद्धतेत ठेवणार नाही.
स्पष्टीकरण :
या कलामन्वये जामिनावर मुक्त करण्यासाठी कालावधी मोजताना आरोपीने कार्यवाहीमध्ये विलंब केल्यामुळे स्थानबद्धतेत घालविलेला कालावधी वगळ्यात येईल.
२) पोटकलम (१) मध्ये काहीही अंतर्भूत असले तरी, आणि त्याच्या तीसऱ्या परंतुकाला अधीन राहून, एखाद्या व्यक्तीविरुद्ध एकापेक्षा जास्त अपराधांचा तपास, चौकशी किंवा खटला प्रलंबित असल्यास, तर न्यायालय द्वारा त्याला जामीनावर सोडले जाणार नाही.
३) पोटकलम (१) मध्ये नमूद केलल्या कालावधीच्या अध्र्या किवा एक तृतीयांश कालावधी पूर्ण झाल्यावर आरोपी व्यक्तीला स्थानबद्ध केलेल्या तुरुंगाचे अधीक्षक, यथास्थिती, अशा व्यक्तीची पोटकलम (१) अतंर्गत जामिनावर सुटका करण्यासाठी न्यायालयाकडष तत्काळ लेखी अर्ज करील.

Leave a Reply