भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ४४५ :
उच्च न्यायालयाचा आदेश कनिष्ठ न्यायालयाकडे प्रमाणित करून पाठविणे :
जेव्हा उच्च न्यायालयाने किंवा सत्र न्यायाधीशाने या प्रकरणाखाली एखाद्या खटल्याचे पुनरीक्षण केले असेल तेव्हा, ते न्यायालय किंवा तो न्यायाधीश पुनरिक्षित निष्कर्ष, शिक्षादेश किंवा आदेश ज्या न्यायालयाने लिहिला किंवा दिला होता त्याच्याप्रत आपला निर्णय किंवा आदेश कलम ४२९ मध्ये उपबंधित केलेल्या रीतीने प्रमाणित करून पाठवील, आणि ज्या न्यायालयाला तो निर्णय किंवा आदेश याप्रमाणे प्रमाणित केला जाईल ते त्यावर याप्रमाणे प्रमाणित केलेल्या निर्णयानुरूप असतील असे आदेश देईल; व जरूर तर, अभिलेख तदनुसार विशोधित केला जाईल.
