Bnss कलम ३८४ : अवमानाच्या विवक्षित प्रकरणातील प्रक्रिया :

भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३
कलम ३८४ :
अवमानाच्या विवक्षित प्रकरणातील प्रक्रिया :
१) जेव्हा भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम २०९, कलम २११, कलम २१२, कलम २१३ किंवा कलम २६५ यामध्ये वर्णन केलेला असा कोणताही अपराध कोणत्याही दिवाणी, फौजदारी किंवा महसूल न्यायालयाच्या नजरेस पडेल अशा प्रकारे किंवा समक्ष घडला असेल तेव्हा, ते न्यायालय अपराध्याला हवालतीत स्थानबध्द करवू शकेल आणि त्याच दिवशी न्यायालय उठण्यापूर्वी कोणत्याही वेळी अपराधाची दखल घेऊ शकेल आणि अपराध्याला या कलमाखाली शिक्षा का होऊ नये याचे काण दाखवण्याची त्याला वाजवी संधी दिल्यानंतर, त्याला जास्तीत जास्त दोनशे रूपये इतका द्रव्यदंड, व द्रव्यदंड न भरल्यास, एक महिन्यापर्यंत असू शकेल इतकया मुदतीच्या कारावासाची शिक्षा ठोठावू शकेल. मात्र तत्पूर्वी असा द्रव्यदंड भरण्यात आला तर गोष्ट वेगळी.
२) अशा प्रत्येक खटल्यात न्यायालय अपराधाची घटकतथ्ये व त्यासोबत अपराध्याने काही कथन केले असल्यास ते तसेच निष्कर्ष व शिक्षादेश नमूद करील.
३) जर भारतीय न्याय संहिता २०२३ याच्या कलम २६५ खालील अपराध असेल तर, ज्याला व्यत्यय आणला किंवा ज्याचा अपमान केला ते न्यायालय ज्या न्यायिक कार्यवाहीचे काम करत होते तिचे स्वरूप व टप्पा आणि व्यत्ययाचे किंवा अपमानाचे स्वरूप हे त्या नोंदीत दर्शवले जाईल.

Leave a Reply